खळबळ! शिवसेना नेते चौगुले यांना जीवे मारण्याची धमकी

vijay Chougule-Shivsena

नवी मुंबई : नवी मुंबईतील शिवसेनेचे नेते, महाराष्ट्र वडार मंडळाचे अध्यक्ष आणि मनपा विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ही धमकी आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अज्ञात आरोपीने चौगुले यांना पत्र पाठवून ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास, जीवे मारू, असे या पत्रात म्हटले आहे. महिलांसोबत तुमचे आक्षेपार्ह फोटो असून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, माझे कोणतेही आक्षेपार्ह फोटो नाहीत, असे चौगुलेंनी म्हटले आहे.