नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची अखेर बदली

Annasaheb Misal

मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ (Annasaheb Misal) यांची अखेर बदली झाली आहे. नागपूरचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. याआधी अण्णासाहेब मिसाळ यांची झालेली बदली दुसऱ्या दिवशी थांबवण्यात आली होती.

राज्यात सुरु असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal) निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अण्णासाहेब मिसाळ यांना नवी मुंबई महापालिकेचे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते. अशात मिसाळ यांची बदली करण्यासाठी निवडणूक आयोगाची मंजुरी आवश्यक होती. परंतु आता मिसाळ यांच्या बदलीचा मार्ग मोकळा झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER