रस्त्यांवरील खड्ड्यांवरून मनसेचे अनोखे आंदोलन, घेण्यात आली लांब उडी स्पर्धा

mns-protest

नवी मुंबई : सध्या नवी मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. वेळोवेळी प्रशासनाला याबाबत अवगत करूनही त्याले दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात घणसोली येथे अनोखं आंदोलन केले. यावेळी खड्ड्यांमधून “लांब उडीची” स्पर्धा घेऊन मनसेने आपला संताप व्यक्त केला. इतकंच नाही तर विजेत्या स्पर्धकांना खेळण्यातील विमानं आणि हेलिकॉप्टर देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आले.

प्रत्येक वर्षी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याकरिता महापालिका करोडो रुपये खर्च करते. परंतु सर्व सामान्य नवी मुंबईकरांना मात्र रस्त्यांवरील खड्डे चुकवत, आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, असं मत मनसेचे संदिप गलुगडे यांनी व्यक्त केले. आगामी ७ दिवसांच्या आत जर रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आले नाही, तर मनसे अधिक आक्रमक आंदोलन करेल, असा इशाराही मनसेने दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER