नवी मुंबई : काही वेळात भाजपाला बसणार धक्का, तीन नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. भाजपाचे तीन नगरसेवक काही वेळात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांना पक्षप्रवेश देण्यात येणार आहे. (Navi Mumbai BJP three corporators will join shivsena big loss to ganesh naik) नवीन गवते, दीपा गवते आणि अपर्णा गवते हे तीन नगरसेवक भाजपा सोडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही गणेश नाईक यांचे खंदे समर्थक आहेत.

ते पक्ष सोडत असल्याने नवी मुंबई भाजपामध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचे दिसते. पालिका निवडणुकांच्या तोंडावर हा भाजपासाठी मोठा राजकीय धक्का आहे. याआधी गणेश नाईक भाजपा सोडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता पक्षात ‘इनकमिंग’ सुरू झाले असे दिसते.

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कपोलकल्पित आहेत, असे भाजपाचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक म्हणाले होते. मी भाजपा सोडण्याचा प्रश्नच येत नाही; खोट्या बातम्या पेरून विरोधकांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, असा टोमणा गणेश नाईकांनी मारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER