नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची ९ मार्चला प्रसिद्धी

नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिका पोटनिवडणुका

by-election

मुंबई : नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक तर नाशिक, धुळे, परभणी व ठाणे या चार महानगरपालिकांतील प्रत्येकी एका रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीकरिता येत्या ९ मार्च रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

विधानसभा मतदारसंघाच्या ३१ जानेवारी २०२० रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी ९ मार्च रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारूप मतदान याद्यांवर १६ मार्च २०२० पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या अनुक्रमे २३ व २४ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जातील. अंतिम मतदार याद्या २६ मार्च रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

सरकार फार काळ टिकणार नाही : रामदास आठवले

नाशिक महानगरपालिकेच्या ४अ, धुळे महानगरपालिकेच्या ५ब, परभणी महानगरपालिकेच्या ११ब आणि ठाणे महानगरपालिकेच्या ३०अ या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील या मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतात.


Web Title : Navi Mumbai, Aurangabad Municipal Corporation release voter lists on March 7

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)