नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला आरपीआयचा पाठिंबा – रामदास आठवले

Ramdas Athavale

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport – NMIA) दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिक भूमिपुत्रांनी मांडली आहे. या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. (Navi Mumbai International Airport should be named after D B Patil; Ramdas Athavale supports protes of locals)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी १० जून रोजी भूमिपुत्रांनी मानवी साखळी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे रामदास आठवले यांनी आज प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले.

माजी आमदार, माजी खासदार रायगडचे भूमिपुत्र नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नवी मुंबईच्या उभारणीत आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात मोठे योगदान आहे. कोकणातील शिक्षण प्रसारात दिबांचे बहुमोल योगदान आहे. नवी मुंबई, रायगड या भागात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले आहे. दि. बा. पाटील यांचे सामाजिक योगदान अनमोल असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले पाहिजे, ही स्थानिक भूमिपुत्रांची मागणी योग्य असून त्या मागणीला रिपब्लिकन पक्ष जाहीर पाठिंबा देत असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) रायगड जिल्हा अध्यक्ष तसेच पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे आदी मान्यवरांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी रामदास आठवले यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी आठवले यांनी आपण आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते.

१९८४ चे राज्यव्यापी शेतकरी आंदोलन
दिबांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली उरण तालुक्यातील जासई गावी, शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा म्हणून झालेल्या व देशभर गाजलेल्या शेतकरी आंदोलनात पाच शेतकर्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या आंदोलनातून प्रस्थापित झालेले साडेबारा टक्के विकसित जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्याचे तत्त्व पुढे महाराष्ट्रातील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना लागू झाले. नवी मुंबईच्या विकासासाठी तिथल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर जनतेच्या प्रश्नांसाठी दिबांनी आयुष्य खर्ची घातले. म्हणून त्यांच्या कर्मभूमीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव देऊन त्यांची स्मृती अजरामर करणे, ही येथील सर्व जनतेची मागणी आहे, असे दशरथ पाटील म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button