दहावीतील मुलीचा गूढ मृत्यू, १५ विद्यार्थ्यांनी शासकीय आश्रमशाळा सोडली

Ashramshala

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील वरसई येथील शासकीय आश्रमशाळा १५ मुलांनी सोडली आहे. आम्ही आमची मुले या आश्रमशाळेत पाठविणार नाही, असा निर्णय या आश्रमशाळेत शिकणार्‍या १५ विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पालकांनी घेतला आहे. हे सर्व पालक तांबडी या गावचे रहिवासी आहेत.

रेल्वे रुळांवर मृत्यू कसा? आता ‘यांचा’ अहवाल ठरणार महत्त्वाचा!

पेण तालुक्यातील वरसई येथील आश्रमशाळेतील दहावीच्या एका विद्यार्थिनीचा मृतदेह झाडाला टांगलेला अवस्थेत आढळून आला होता. सदर मुलीचा मृतदेह शाळेपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलातील झाडावर आढळून आला होता. या मुलीच्या गूढ मृत्युमुळे सध्या खळबळ माजली आहे.

सदर मुलीची लहान भावंडेही याच आश्रमशाळेत सातव्या आणि नवव्या वर्गात शिकत आहेत. त्यांनाही पालकांनी आश्रमशाळेतून घरी आणले आहे. मृत विद्यार्थिनीने कुणाच्या परवानगीने आश्रमशाळा सोडली? असा सवाल तिच्या वडिलांनी विचारला आहे. आश्रमशाळेतील सुरक्षाविषयक व्यवस्थेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.