गोव्यात नौदलाचे लढाऊ विमान कोसळलं; पायलट बचावले

Mig 29

भारतीय नौदलाचं ‘मिग २९ के’ हे लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान गोव्यात कोसळले. विमान निर्मनुष्य भागात कोसळल्यानं जीवितहानी झालेली नाही. विमानातील दोन्ही पायलटने पॅराशूटच्या मदतीनं उड्या मारल्यानं ते बचावले.


गोवा : भारतीय नौदलाचं ‘मिग २९ के’ हे लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान गोव्यात कोसळले. विमान निर्मनुष्य भागात कोसळल्यानं जीवितहानी झालेली नाही. विमानातील दोन्ही पायलटने पॅराशूटच्या मदतीनं उड्या मारल्यानं ते बचावले.

दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्यातील ‘आयएनएस हंसा’ हवाई तळावरून हे विमान उडाले होते. काही वेळातच एक पक्षी विमानावर आदळला. त्यानंतर विमानाचे इंजिन पेटले.

अपघातग्रस्त विमानात दोन पायलट होते. इंजिनाला आग लागल्यानंतर त्या दोघांनीही विमानाच्या बाहेर उड्या घेतल्या आणि पॅराशूटच्या मदतीनं खाली उतरले. स्थानिकांनी त्यांना मदत केली. लेफ्टनंट कमांडर दीपक यादव आणि कॅप्टन एम. शेवखंड अशी पायलटची नावे आहेत.