‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे नटू काका यांना जेठालाल यांच्या म्हणण्यावर मिळाली शोमध्ये जागा

Nattu Kaka-Jethalal

टीव्ही कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चा (Taraq Mehta Ka Ulta Chashma) नटू काका ऊर्फ घनश्याम नायक यांना ऑनस्क्रीन पाहण्यास चाहते खूप मिस करत आहेत. नुकतेच घनश्याम नायक शोमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलले. एका न्यूज पोर्टलशी बोलताना घनश्याम नायक म्हणाले, “आधी मला दुसर्‍या भूमिकेसाठी फायनल करण्यात आले. यानंतर शोमध्ये गडा इलेक्ट्रॉनिक्समधील वयोवृद्ध व्यक्तिरेखा साकारण्याविषयी चर्चा झाली. या भूमिकेसाठी मेकर्सदेखील कलाकारांचा शोध घेऊ लागले.”

घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) म्हणतात की, एक दिवस दिलीप जोशी (Dilip Joshi) ऊर्फ जेठालाल (Jethalal)यांनी या भूमिकेसाठी शोचे निर्माते असितकुमार मोदी यांना माझे नाव सुचवले. ते सहमत झाले आणि मला हे पात्र मिळाले. आज प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा खूप आवडली आहे. सांगण्यात येते की, घनश्याम नायक यांच्या घशातील शस्त्रक्रिया अलीकडेच झाली आहे, त्यानंतर ते विश्रांती घेत आहेत.

एका माध्यमाशी बोलताना घनश्याम म्हणाले की, “मी आता बराच चांगला आहे. आठ गाठी (Knots) काढल्या आहेत आणि इतक्या गाठी कशा बनल्या हे मला माहिती नाही. त्या गाठी चाचणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. माझा देवावर विश्वास आहे, ‘तो जे काही करेल ते चांगले काम करेल.’ कार्यक्रमात परत येण्याबद्दल घनश्याम नायक म्हणतात की, माझी टीम सेटवर प्रतीक्षा करीत आहे; परंतु रुग्णालयातून निघाल्यानंतर मला सुमारे एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नवरात्रीपूर्वी मला पुन्हा शूटिंगला जाणे कठीण होईल.

ही बातमी पण वाचा : माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनविली साबुदाणा खिचडी, अभिनेत्रीने व्हिडिओ केला शेअर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER