राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु ; पवारांच्या पक्षात दीडशे जणांचा प्रवेश

- शिवसंग्रामला मोठा धक्क

NCP - Sharad Pawar

मुंबई :- बीडमध्ये (Beed) सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे . काका- पुतण्याच्या राजकीय युद्धात आता शिवसंग्रामला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) चार नगरसेवक शिवसेनेत (Shiv Sena) गेल्यानंतर आ. संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी शिवसंग्रामच्या एका बड्या नेत्याला फोडल्याने बीडमधील राजकीय वातावरण ढवळले आहे. शिवसंग्रामचे (Shiv Sangram) विनोद हातांगळे (Vinod Hatangale) यांच्यासह तब्बल 150 कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्याने शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे.

बीड मतदारसंघात शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) आणि राष्ट्रवादीचे आ. संदीप क्षीरसागर या काका पुतण्यात रस्सीखेच सुरू असते. अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत आ. संदीप क्षीरसागर यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यातच काही दिवसात राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का दिला होता.

बीड नगरपालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोरच राष्ट्रवादीला धक्का बसल्याने संदीप क्षीरसागरांनी आता शिवसंग्रामच्या नेते- कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आ. विनायक मेटे यांना मोठा झटका दिला आहे. पेठ बीड परिसरात विनोद हातांगळे यांची मोठी पकड आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने हातांगळे यांच्यासह 150 कार्यकर्त्यांना जाहीर प्रवेश देत पक्ष विस्तार केला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER