राष्ट्रवादीच ‘मिशन घरवापसी’; अनेक आमदार पवारांच्या संपर्कात, पक्षाची अधिकृत माहिती

Sharad Pawar

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेत राष्ट्रवादीकडून (NCP) लवकरच ‘मिशन घरवापसी’ (Mission Gharwapasi) राबवण्यात येणार असल्याचीचर्चा रंगू लागली आहे. गयारामांना पुन्हा पक्षात घेण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील (Jayant patil) यांच्याकडे दिल्याचीही माहिती पुढे आली आहे. या सगळ्यावर आता राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

‘विधानसभा निवडणुकीपूर्वी जे आमदार भाजपमध्ये (BJP) गेले त्यांना तिथं कुठलीही किंमत नाही. त्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादीत येण्याच्या विचारात आहेत. हे आमदार शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत संपर्कात आहेत. असे आमदार स्थानिक राजकारणाचा विचार करून लवकरच पक्ष प्रवेश करणार आहेत,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी नवाब मलिक यांनी पार्थ पवार यांच्याबाबतही भाष्य केलं आहे. ‘पार्थ युवा नेते आहेत. त्यांचा अनुभव कमी आहे. पार्थ यांनी केलेलं वक्तव्य गांभीर्य घेण्यासारखे नाही. तरुणांकडून चूका होतात त्यात सुधारणा करता येतात,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं.

ह्या बातम्या पण वाचा : 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER