राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच; मधुकर पिचडांना मोठा धक्का देत खंदे समर्थक राष्ट्रवादीत

Nationalist Incoming Continues; Khande supporters in the NCP giving a big push to Madhukar Pitchad

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pitchad) याना राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. त्यांचे कट्टर समर्थक असलेले सीताराम गायकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर(NCP) विश्वास ठेवत पक्षाचा झेंडा हाती धरला. आमचं सरकार नसतं, तर तुम्ही पक्षात आला असता की नाही, हे माहिती नाही, असे शालजोडीत लगावून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गायकरांचे स्वागत केले. गायकर हे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकचे माजी चेअरमन आहेत.

पक्षप्रवेशानंतर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शेलक्या शब्दात गायकर यांना चिमटा काढला. आमचं सरकार आलं नसतं, तर तुम्ही राष्ट्रवादीत आला असतात की नाही, हे माहिती नाही. मी याच ठिकाणी बसलो होतो. त्यावेळी कोणी पक्षात राहायला तयार नव्हतं. मधुकर पिचड यांनी पक्ष का सोडला, हे अजूनही मला उमगलं नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा अनेक पक्षातील नेत्यांना आदर आहे. अनेक जणांना आपल्या पक्षात यायचं आहे. राष्ट्रवादी हा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER