लॉकडाऊनवरून राष्ट्रवादीत मतभिन्नता; अनेक नेते लॉकडाऊनच्या विरोधात

Nawab Malik - Rajesh Tope - Praful Patel

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्याच्या दृष्टीने नियोजन करा, अशी सूचना केली आहे. यावर भाजपने आक्षेप नोंदवत लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. तर सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांमध्ये मात्र मतभिन्नता दिसून येत आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, याची चिंता राज्य सरकारला आहे.

लॉकडाऊनची कोणालाही हौस नाही. पण आपली संसाधनं जर वाढत्या रुग्णांच्या पुढे कमी पडत असतील तर लॉकडाऊन करावा लागतो, असे सूचक विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. पुन्हा लॉकडाऊन राज्याला परवडणारे नाही. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार करायला हवा. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकतो, असेही पटेलांनी म्हटले आहे. यामुळे लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका याबाबत दिसत आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबद्दल आतापासूनच विरोध केला जात आहे. त्यामुळे आता या विषयावरून नव्या वादाला तोंड फोडणार असे दिसत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही काल लॉकडाऊनला विरोध केला होता.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा विचार होऊ शकतो; पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले. लॉकडाऊन हा राज्याला परवडणारा नाही. जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष्य केंद्रित करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनीही प्रशासनाला आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी कोरोनाचे नियम पाळले पाहिजे. काळजी घेतली पाहिजे. नियम पाळल्यास कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button