वाझे प्रकरणात जप्त केलेली कार फडणवीसांच्या ‘गुडबुक्स’मधल्या बिल्डरची; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मुंबई : सचिन वाझे प्रकरणाचा (Sachin waze case) तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने आणखी एक महागडी कार जप्त केली आहे. ही व्हॉल्वो कार थेट दमणमधून जप्त करण्यात आली. ही कार सचिन वाझे याच्या बिझनेस पार्टनरची असल्याचं बोललं जात आहे. मात्र या कारबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा खुलासा केला आहे. जप्त करण्यात आलेली व्हॉल्वो कार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘गुडबुक्स’मधल्या एका बिल्डरची असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. तशी फेसबुक पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अधिकृत पेजवरून केली गेली आहे.

एटीएसच्या तपासामुळे ‘कहानी में ट्विस्ट!’ महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनीष भतिजांची? मनीष भतिजा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर. मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे कहानी में ट्विस्ट आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे, ती बिल्डर मनीष भतिजा यांची असल्याचे समजते. मनीष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात.

याच मनीष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी २४ एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा मनीष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते, त्या प्रसाद लाड यांचे हे मनीष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका उठत असताना पोलीस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत, अशी पोस्ट राष्ट्रवादीने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER