राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकऱ्यासाठी आंदोलन; केंद्र सरकारचा सोलापुरात निषेध

मुंबई :- देशात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्यांना फटका बसेल अशी प्रचंड इंधन दरवाढ झाली आहे गॅस पेट्रोलच्या किमती (Petrol price hike) झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत . यासोबतच केंद्राकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. यापार्श्वभूमीवर सोलापुरात (Solapur) राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन (NCP Protest) पुकारले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या दरवाढीचा निषेध म्हणून याविरोधात राज्यभरात देशाचे नेते शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन हाती घेण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने पालकमंत्री दत्तात्रय भरणे व पक्ष निरिक्षक सुरेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे शेतकरी विरोधी केंद सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

याचवेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणााबाजी करण्यात आली. राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंध नियमांचे व सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मास्कचा वापर करत राष्ट्रवादीने हे आंदोलन यशस्वी केले व त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले.

ही बातमी पण वाचा : तक्रारीची दखल न घेतल्याने किरीट सोमय्या यांचे पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button