नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणाची २६ डिसेंबरला सुनावणी

नवी दिल्ली : आपल्या पदाचा दुरुपयोग करुन नॅशनल हेराल्डची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला अशी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टाकली होती. आता या प्रकरणी न्यायालयाने आपला आदेश राखत सुनावणी २६ डिसेंबर रोजी पुढे ढकलली आहे.

नॅशनल हेराल्ड या प्रकरणाची शहानिशा होण्यासाठी, कंपनी ज्या मालकीची आहे त्या असोसिएटेड जर्नल लिमिटेडच्या कागदपत्रांची आणि अकाउंट बुक्सची तपासणी व्हावी अशी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टाकली होती.

पटियाला हाउसचे मॅजिस्ट्रेट लवलीन यांनी दोन्ही पक्षाच्या वकिलांचे म्हणणे ऐकून हा निकाल २६ तारखेपर्यंत राखून ठेवला आहे.