भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता

bharat-biotech-covid-vaccine-covaxin

मुंबई : सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या  (CDSCO) कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकची ( Bharat Biotech) देशी कोविड लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती. अखेर त्याला मान्यता मिळाली. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. यापूर्वी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या  (CDSCO)  तज्ज्ञ समितीने सीरम संस्थेच्या कोविशिल्डच्या (covishield) आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती. यानंतर वरील दोन्ही लसी अंतिम मंजुरीसाठी देशाच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल अर्थात डीसीजीआय व्हीजी सोमानी यांच्याकडे पाठवण्यात आल्या होत्या.

त्यांनी या लसींच्या तातडीच्या वापरास मंजुरी दिली. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेली आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका या औषधी कंपनीने तयार केलेली ही लस पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने  (एसआयआय)  कोविशिल्ट म्हणून विकसित केली आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन नावाची एक स्वदेशी कोविड लस तयार केली .

ऑक्सफर्ड आणि  अ‍ॅस्ट्रॅजेनेका   (Oxford AstraZeneca Coronavirus Vaccine) या कंपनीनं विकसित केलेली आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये (Serum Institute of India) उत्पादित होणारी ही ‘कोविशिल्ड’ (covishield) लस आहे. यासाठी आधीपासूनच सरकारनं पावलं (Government Of India) उचलायला सुरुवात केली होती. मंगळवारी (२९ डिसेंबर) ब्रिटनने ऑक्सफर्डच्या (Government of the United Kingdom) या लसीला मान्यता दिली. त्यानंतर भारतातही या लसीला मान्यता मिळाली.

ही बातमी पण वाचा : अखेर कष्टाचं चीज झाले ; अदर पुनावाला यांनी ट्विट करून व्यक्त केला आनंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER