राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक वनराज भाटिया यांचे निधन

Maharashtra Today

मुंबई : दिग्गज संगीत दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते वनराज भाटिया (९३) (National award winning music director Vanraj Bhatia)यांचे ७ मे रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. ते दीर्घकाळापासून वार्धक्याशी संबंधित आजारांशी लढत होते.

३१ मे १९२७ रोजी वनराज भाटिया यांचा जन्म झाला. त्यांनी रॉयल अॅकेडमी ऑफ म्युझिकमधून संगीताचे शिक्षण घेतले. १९५९ मध्ये ते भारतात परतले आणि जाहिरातींसाठी जिंगल बनवण्याचे काम सुरू केले. त्यांनी ७००० पेक्षा जास्त जाहिरातींसाठी जिंगल दिले. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

१९७२ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्या वेळी समांतर सिनेमाची चर्चा सुरू झाली होती. श्याम बेनेगल, गोविंद निहलानी सारखे दिग्दर्शक सक्रिय होते. ‘जाने भी दो यारों’, तरंग, द्रोहकाल, अंकुर, निशांत, ३६ चौरंगी लेन, मंथन, भूमिका, सारख्या कलात्मक चित्रपटांना संगीत दिले. ‘अजूबा’ या व्यावसायिक चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिले होते.
‘तमस’ साठी १९८८ मध्ये त्यांना संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर १९८९ मध्ये त्यांना संगीत अकादमीतर्फे गौरविण्यात आले होते. २०१२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button