नाथन लियोन म्हणाला- कोहलीशिवाय भारत बळकट, संघात अनेक ‘सुपरस्टार्स’

Nathan Lyon-Virat Kohli

अनुभवी फिरकीपटू नाथन लियोनचा विश्वास आहे कि आगामी कसोटी मालिकेच्या शेवटच्या तीन सामन्यात विराट कोहलीची (Virat Kohli) अनुपस्थिती निराशाजनक आहे, पण यामुळे ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याचा दावेदार ठरणार नाही, कारण भारतीय संघात अनेक ‘सुपरस्टार्स’ आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोहलीला पितृत्वाची रजा मंजूर केल्यामुळे भारतीय कर्णधार कोहली एडिलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. जानेवारीच्या सुरुवातीला कोहलीला आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी आपली अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मासोबत रहाण्याची इच्छा आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असलेल्या कोहलीला बाद करण्याची मर्यादित संधी मिळेल हे निश्चितच निराशाजनक असल्याचे कसोटीतज्ज्ञ लियोनने सांगितले. तो म्हणाला, ‘मालिकेसाठी हे निराशाजनक आहे. आपल्याला जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरूद्ध खेळायचे आहे. माझा विश्वास आहे की स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांच्यासह तो सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. हे निराशाजनक आहे परंतु तरीही त्यांच्याकडे सुपरस्टार्स आहेत.’

ही बातमी पण वाचा : IND vs AUS: कोहलीला सिडनीमध्ये क्वारनटीनसाठी मिळाला रग्बी दिग्गजाचा सूइट

लियोनने फॉक्स स्पोर्ट्सला सांगितले की, “(चेतेश्वर) पुजारा, अजिंक्य (रहाणे) सारख्या त्याच्या संघातील अव्वल फलंदाज आणि काही चांगले तरुण खेळाडू आहेत. तेव्हाही आमच्यासाठी हे एक मोठे आव्हान असेल.” तो म्हणाला, “विराट खेळत नाही, याचा अर्थ असा नाही की आपली ट्रॉफी जिंकण्याची खात्री आहे. अजून मेहनत घ्यावी लागेल.’

ऑस्ट्रेलिया दौर्‍यामध्ये भारताला तीन एकदिवसीय सामने, तीन टी -२० आंतरराष्ट्रीय आणि चार कसोटी सामने खेळायचे आहेत. या दौर्‍याची सुरुवात २७ नोव्हेंबरला एकदिवसीय मालिकेपासून होईल. एडिलेडमध्ये कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होईल. कोहली मेलबर्नमधील (२६ ते ३० डिसेंबर) बॉक्सिंग डे कसोटी, सिडनीमधील नवीन वर्षाची कसोटी (७ ते ११ जानेवारी) आणि ब्रिस्बेनमधील शेवटची कसोटी (१५ -१९ जानेवारी) नाही खेळणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER