IND vs AUS: नाथन लॉयन ऑस्ट्रेलियाच्या टी -२० संघात झाला सामील, कॅमेरून ग्रीन झाला रिलीज

Nathan Lyon

नाथन लॉयन हा कसोटी क्षेत्रातील तज्ज्ञ गोलंदाज मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने केवळ दोन  टी -२० सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या निवडकर्त्यांनी कॅमरून ग्रीनच्या जागी लॉयनला टी -२० संघात स्थान देऊन सर्व क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

ऑस्ट्रेलिया निवड समितीने कॅमरून ग्रीनच्या जागी नाथन लॉयनला भारताविरुद्धच्या ३ टी -२० मालिकेच्या अखेरच्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान दिले आहे. भारत-A बरोबर खेळल्या जाणार्‍या सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया-A संघात सामील होण्यासाठी ग्रीनला राष्ट्रीय संघातून सोडण्यात आले आहे.

कॅमरून ग्रीनच्या जागी नाथन लॉयनचा टी -२० संघात समावेश हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे; कारण त्याला टी -२० तज्ज्ञ मानले जात नाही. या प्रकारात त्याने फक्त दोन  सामने खेळले आहेत. त्याने आपला अखेरचा टी -२० सामना वर्ष २०१८ मध्ये खेळला होता.

शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी -२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव झाला. या सामन्यात दोन लेग स्पिनर अ‍ॅडम जम्पा आणि मिशेल स्वीपसन यांना संधी देण्यात आली. संघाकडे सध्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्न आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार आरोन फिंचला हिप इजा झाली होती, त्याचा स्कॅन रिपोर्ट अजून येणे बाकी आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर ६ डिसेंबरला भारताला दुसरा टी -२० सामना खेळायचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER