शिवसेनेकडून नाथाभाऊंचा करेक्ट कार्यक्रम, ते नगरसेवक होते राष्ट्रवादीच्या वाटेवर

Maharahtra Today

मुंबई : मुक्ताईनगर नगर परिषदेतील भाजपच्या सहा नगरसेवकांनी मोठा धक्का देत बुधवारी सांयकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवबंधन मनगटावर बांधले. तर आणखी चार नगरसेवक आज शिवबंधन बांधणार आहेत. हा भाजपसाठी नव्हे तर राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्या संपर्कात असलेल्या नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि विशेष म्हणजे नाथाभाऊंचाच करेक्ट कार्यक्रम केला आहे. हे नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर होते, असे पाटील यांनीच आज स्पष्ट केले.

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. जळगाव महापालिकेतील सत्ता गमावल्यानंतर दहा नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश भाजपसाठी जबर धक्का मानला जात आहे. खरे पाहता हे नगरसेवक एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक असल्याची माहिती पुढे आली आहे. हे नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत होते. मात्र गुलाबराव पाटील यांनी कुठलीही कुणकुण न लागू देता नाथाभाऊंना त्यांनाही मोठा धक्का दिला आहे. मुक्ताईनगर नगरपरिषदेतील १७ पैकी १३ नगरसेवक आता शिवसेनेच्या गोटात सामील झाले आहेत.

पक्ष प्रवेशाबाबत पाटील म्हणाले, १७ पैकी १३ नगरसेवक हे शिवसेनेकडे आले आहेत, त्यामुळं हा धक्का कोणाला ते समजून घ्या. हे सर्व नगरसेवक नाथाभाऊंचे खंदे समर्थक होते. ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. पण शिवसेनेत आले. आम्ही भाजपचे नगरसेवक शिवसेनेत घेतले आहेत. मुक्ताईनगर नगरपरिषदेत सत्ताबदल होऊन आता भगवा फडकवणार आहे. जात, धर्म, पंत सोडून हे प्रवेश विकासासाठी झाले आहेत. आम्ही फोडाफाडी करत नाही. काम करणारे लोक आम्ही पक्षात घेत आहोत. अशाप्रकारेच पक्षप्रवेश भाजपनेही आधी केले आहेत. त्यामुळे त्यांना दबाव माहिती असेल. आम्ही आता बाकीचा कोरोना दूर करतोय, असा टोला पाटील यांनी लगावला.

मुक्ताईनगरमध्ये माझा विजय झाल्याने विकासकामांचा अनुशेष भरून काढत आहे. भाजपचे नगरसेवकही माझ्याकडे गऱ्हाणी घेऊन येतात. शिवसेनेत यायची इच्छा त्यांनीच बोलून दाखवली. शिवसेनेचे प्रस्थ तिथे वाढत आहे हे महत्त्वाचे आहे. भाजपचे राजकारण सुरू झालं होतं. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना वाढत आहे. तिथे धक्का कोणाला हे तुम्हाला माहिती आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, मुक्ताईनगर नगरपरिषदेतील नगरसेवक पियूष महाजन, मुकेश वानखेडे, संतोष कोळी, शबाना अब्दूल अरिफ, नुसरत मेहबूब खान, बिल्कीज अमानउल्ला खान या नगरसेवकांनी प्रवेश केला असून, आज आणखी चार नगरसेवक दाखल होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button