नाथाभाऊ मूळचे ‘राष्ट्रवादी’चेच, त्यांनी पवारांच्या नेतृत्वात काम केले;दानवेंचा खुलासा

Eknath Khadse-Raosaheb Danve-Sharad Pawar.jpg

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भारतीय जनता पक्षाचा (BJP) राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाण्याचा निर्णय घेतला . आज त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे . यापार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाथाभाऊ हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. ते शरद पवारांच्या नेतृत्वाखालील एस काँग्रेसमध्ये होते, असे दानवे म्हणाले आहेत .

नाथाभाऊ हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एस काँग्रेसची स्थापना केली होती. त्यात नाथाभाऊ होते. त्यावेळी पवारांना नागपूर ते पंढरपूर दिंडी काढली होती. त्यातही नाथाभाऊ होते, असा दावा दानवे यांनी केला.

मी आणि नाथाभाऊ भाजपमध्ये सीनियर आहे. त्यामुळे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, एकनाथ खडसे आदी आम्हा सर्वांना एकमेकांची वाटचाल माहीत आहे, असेहो दानवे म्हणाले .

राजकारणात पक्ष सोडण्याच्या घटना घडत असतात. अनेक नेते अनेक वर्षे पक्षात राहून नंतर पक्ष सोडतात. नाथाभाऊंनी सत्ता भोगली. पदं भोगली आणि 40 वर्षानंतर पक्ष सोडला. त्यांनी पक्ष सोडू नये असे वाटत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER