नाशिक : ऑक्सिजन गळती ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे; चौकशी समितीचा अहवाल

nashik-oxygen-leak-tragedy

नाशिक :- नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिल रोजी ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी कोरोनाच्या २५ रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. हा अपघात ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे झाला, असे समितीने म्हटले आहे. समितीने चौकशी अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द केला आहे.

चौकशीचा अहवाल सुपूर्द
या अपघाताच्या चौकशीसाठी सात सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती. या समितीला १५ दिवसांत अहवाल सादर करायचा होता. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

चौकशी समितीचे सदस्य
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे या समितीचे अध्यक्ष होते. समितीत वैद्यकीय अधिकारी, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम करणाऱ्या लोकांचा समावेश होता.

घटना

झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिल रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाली. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले रुग्ण ऑक्सिजनअभावी तडफडत होते. गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. जवळपास एक-दीड तासानंतर ऑक्सिजन गळती थांबवण्यात यश आले. रुग्णालयात १५० रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यातील २५ रुग्णांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button