नाशिक मनपा : सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाले फक्त एकच मत!

नाशिक : नाशिक महापालिकेच्या (Nashik Mahanagarpalika) शिक्षण समिती सभापती आणि उपसभापतिपदाची कोरोनामुळे (Corona) लांबलेली निवडणूक आज झाली. भाजपाच्या (BJP) उमेदवार संगीता गायकवाड यांची सभापतिपदी निवड (Election as Chairman) झाली. सेनेच्या (Shivsena) उमेदवार ज्योती खोले यांचा दारुण पराभव झाला. त्यांना फक्त एकच (स्वतःचे) मत मिळाले!

कोरोनामुमुळे महापालिकेच्या महासभेसह समित्यांची निवडणूक ऑफलाईन झाली. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रकिया झाली.

शिक्षण समिती सभापतीपदासाठी भाजपाकडून संगीता गायकवाड व उपसभापतिपदासाठी शाहीन मिर्झा यांनी अर्ज भरला होता. शिवसेनेकडून ज्योती खोले यांनी अर्ज दाखल केला होता. सत्ताधारी भाजपाकडे बहुमत असल्यामुळे संगीता गायकवाड आणि शाहीन मिर्झा यांची निवड निश्चित मानली जात होती.

परंतु, शिवसेनेकडून ज्योती खोले यांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक घेण्यात आली. अपेक्षेप्रमाणे संगीता गायकवाड विजयी झाल्यात. ज्योती खोले यांना फक्त एकच (स्वतःचे) मत मिळाले.

दरम्यान, शहर सुधार आणि आरोग्य समितीच्या निवडणुकीत सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला दोन अर्ज दाखल करावे लागले होते. स्वाक्षरीमुळे उमेदवाराचा अर्ज बाद झाला त्यामुळे भाजपाने ही खबरदारी घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER