नाशिकमध्ये भाजप-मनसेची दिलजमाई; स्थायी समितीसाठी मनसे करणार भाजपची मदत

BJP-MNS

नाशिक : नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) स्थायी समिती (Standing committee) सभापतीच्या निवडणुकीसाठी भाजप-मनसेची (BJP-MNS) पुन्हा एकदा दिलजमाई झाली आहे. या निवडणुकीत भाजपला मदत करण्याचा निर्णय मनसेच्या वरिष्ठ पातळीवरुन झाला आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खबरदारी घेताना दिसत आहे.

भाजप आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) दोघांचेही प्रत्येकी 8 सदस्य असल्यामुळे रंगत अधिकच वाढली आहे. नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसे किंगमेकरची भूमिका निभावणार आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत आलेल्या अनुभवामुळे भाजप सावधगिरी बाळगताना दिसत आहे. स्थायी समितीचे भाजपचे 8 सदस्य गुजरातला रवाना झाले आहेत.

नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सर्वच 16 सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची महापौरांकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात तक्रार केली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यात आली. यामुळे शिवसेनेची सदस्यसंख्या एकाने वाढली आहे. सत्ताधारी भाजपला हायकोर्टाच्या निर्णयाचा मोठा धक्का बसला, तर शिवसेनेला एक जागा अधिकची मिळाली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना होणार असल्यामुळे मनसे स्थायी निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER