शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे आघाडी सरकारला ५ नव्हे तर २५ वर्षे भीती नाही : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal

नाशिक : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.  शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारला आता ५ नाही तर २५ वर्षे भीती नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचे नंबर एकचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप सोडली. जयसिंगराव गायकवाड यांनीही भाजपला रामराम ठोकला. पदवीधरमध्ये पुणे, नागपूरमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे आता राजकारणाची हवा बदलली आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने करण्यात येत आहे.

पण महाविकास आघाडी एकसंध राहील, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. आता भीती महाविकास आघाडी नाही तर भाजपच्या लोकांना आहे. भाजपमधील लोकप्रतिनिधींनी खडसे आणि जयसिंगरावांच्या पावलावर पाऊल टाकायचं  ठरवलं तर अवघड होईल, असा टोलाही भुजबळांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER