मोठी बातमी , भाजपचा नेत्याने नाशिकमध्ये घेतली राज ठाकरेंची भेट!

nashik-bjp-leader-meets-mns-chief-raj-thackeray

मुंबई : नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला आहे . मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) नाशिकच्या दौऱ्यावर आहे. भाजपच्या (BJP) नेत्याने हॉटेलमध्ये जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरे शुक्रवारपासून नाशिकमध्ये मुक्कामी आहे. पहिल्या दिवशी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर आज सकाळी भाजपचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palve) भेटीसाठी पोहोचले. पालवे यांनी राज यांची भेट घेतली आणि चर्चा केली. पालवे यांच्या भेटीमुळे मनसे भाजपला टाळी देणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .

महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये मनसेने भाजपला मदत केली होती. त्यामुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीत देखील मनसे भाजपाला मदत करणार आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. आगामी महापालिका निवडणुका पाहता नाशिकमध्ये भाजप आणि मनसेत जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये मनसे भाजप युती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER