‘कोहली’ला गर्विष्ठ म्हणणारे ‘शहा’च ठरले नेटकरांचे टार्गेट

virat-shah

मुंबई :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला अभिनेते नसरूद्दीन शहा यांनी गर्वीष्ठ म्हणून संबोधले होते. नसरूद्दीन शहाच्या या पोस्ट मधून कोहलीवर केलेल्या टीकेचा नेटीझन्सने चांगलेच मनावर घेतले असून नेटीझन्सने शहांनाच टार्गेट केले आहे.

नसरूद्दीन शहा यांनी त्यांच्या फेसबूक वॉलवर कोहली हा फक्त जगातील सर्वोत्तम फलंदाज नाही, तर जगातील सर्वांत गर्विष्ठ खेळाडू आहे. त्याची क्रिकेटमधील क्षमता त्याच्या अहंकार आणि उद्धट व्यवहारासमोर खुजा ठरतो. असे लिहीले होते. तसंच माझा देश सोडण्याचा कोणताही हेतू नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

facebookनसरूद्दीन शाह यांनी कोहलीच्या आॉस्ट्रेलिया दौ-यातील कामगिरीवरून नसरूद्दीन शहा यांनी ही पोस्च केली मात्र, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना तोडीसतोड उत्तर द्यायलाच हवे आणि कोहली तेच करतोय, अशी काही चाहत्यांनी कोहलीची पाठराखण केली. म्हणून नसीरूद्दीन यांच्या टीकेनंतर नेटीझन्सने त्यांना उपदेश देण्यास सुरुवात केली आहे.