शरद पवारांना दैवत मानणारे नरहरी झिरवाळ हंगामी अध्यक्ष

Sharad Pawar & narhari zirwal

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, लवकरच त्याची औपचारिक घोषणा होणार आहे. त्यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सादर केकेला आहे. त्यामुळे आता नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत शरद पवारांना (Sharad Pawar) आपले सर्वस्व मानणारे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्षराहणार आहेत.

नरहरी झिरवाळ यांची शरद पवारांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. नरहरी झिरवाळ हे नाशिकमधील दिंडोरीचे आमदार आहेत. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी झिरवाळदेखील बेपत्ता झाले होते. काही दिवसांनंतर नरहरी झिरवाळ शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी दिसले, तेव्हा ‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ असं भावनिक उत्तर देऊन झिरवाळ यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांची तोंडं बंद केली होती.

शरद पवार साहेब हे माझं दैवत आहेत. त्यांनी मला पाचव्यांदा उमेदवारी दिली. आधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे मी विश्वासघात करणार नाही, असं झिरवाळ म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER