… रक्ताने शेती केवळ काँग्रेसच करू शकते, नरेंद्रसिंह तोमर यांची बोचरी टीका

दिल्ली : कृषी कायद्याच्या मुद्यावर राज्यसभेत उत्तर देताना कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी काँग्रेसवर (Congress) बोचरी टीका केली, संपूर्ण जगाला माहीत आहे शेती पाण्यानेच होते, रक्ताने शेती केवळ काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात २६ जानेवारीला निदर्शकांनी हिंसाचार केला. काँग्रेस त्याचे समर्थन करते आहे, असे सुचवताना तोमर यांनी ही टीका केली.

तोमर म्हणालेत, शेतकऱ्यांना भडकवण्यात आले आहे की उद्योजक तुमची जमीन घेऊन टाकतील. शेतकऱ्यांमध्ये मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. देशात सध्या उलटी गंगा वाहते आहे. शेतकरी संघटनांना दोन महिन्यांपासून विचारत आहोत, कायद्यात काय चूक आहे? शेतकरी नेते सांगू शकले नाहीत. शेतकरी संघटना केवळ कायदा रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. आम्ही कर माफ केला तर आता राज्य सरकार कर आकारते आहे. जे कर आकारत आहेत, त्याच्या विरोधात आंदोलन व्हायला पाहिजे कायद्यात काय कमतरता आहेत, हे शेतकरी नेत्यांनी सांगावं?”

पंजाबचा उल्लेख करत तोमर म्हणालेत, भारत सरकार कायद्यात कोणत्याही बदलासाठी तयार आहे, याचा अर्थ असा लावला जाऊ नये की कृषी कायद्यात काही चूक आहे. एका राज्यात लोक गैरसमजाचे बळी ठरले आहेत. हा एकाच राज्याचा मुद्दा आहे. आम्ही वारंवार सांगितले आहे की एपीएमसी संपुष्टात येणार नाही. मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल करणे सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER