संभाजीराजे आणि उदयनराजेंना एकत्र आणणार, नरेंद्र पाटलांचा निर्धार

narendra patil - sambhaji raje - udayan raje - Maharashtra Today

बीड : मराठा आरक्षणाचा (Maharatha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह शिवेंद्रसिंहराजे भोसले, विनायक मेटे (Vinayak Mete) आदी नेतेमंडळींना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांची ‘एन्ट्री’ नेहमीच दणकेबाज असते. एकदा शब्द दिला की तो पूर्ण केल्याशिवाय ते मागे बघत नाहीत. त्या सर्वांनी एकत्र यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले असून आताही करत आहोत. आमची साद ते नक्की ऐकतील आणि लवकरच त्यांची दणक्यात एकत्रित एन्ट्री होईल, असा ठाम विश्वास आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद पाटील (Narendra Patil) व्यक्त केला.

‘मराठा आरक्षणाच्या लढ्यात माझ्यासह राज्यातील अन्य ४२ कुटुंबांनी घरातील कर्ता माणूस गमावला आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, मराठ्यांच्या भावना सगळ्यांनी समजावून घ्या, राजकारण बाजूला ठेवून आरक्षणासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावे, अशी भावनिक साद यांनी राज्यातील सर्व आमदार व खासदारांना घातली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गायकवाड समितीच्या माध्यमातून १६ टक्के आरक्षण जाहीर केले. मराठा समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षा व सारथीच्या माध्यमातून खूप फायदा झाला. या समाजातील सुशिक्षित बेरोजगारासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम करत आरक्षणाला समांतर फायदेही त्यावेळी शासनाने दिले. मात्र, अलिकडे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजासमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षणा बरोबरच समांतर योजनाही पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या पाहिजेत. मराठा समाजाला इथपर्यंत आणण्यासाठी अनेक मातब्बर मंडळींनी काम केले आहे व करीत आहेत. आपणही ज्या पक्षात आहात त्या पक्षाकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे व प्रत्यक्ष विनंती करावी. कायदेशीर बाजू भक्कम करून आरक्षण लढाई यशस्वी करण्यास साथ द्यावी असे आवाहन पत्रात करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button