कट्टर विरोधक असलेले नरेंद्र पाटील उदयनराजेंच्या भेटीला, चर्चेला उधाण

narendra-patil- udayan-raje-bhosale

सातारा : ‘राजकारणात कुणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो’, असं नेहमी सांगितलं जात त्याचा अप्रत्यय साताऱ्यात दिसून आला. एकेकाळी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दोन नेते एकत्र आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांची भेट घेतली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil)आर्थिक विकास महामंडळचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण प्रश्नावरील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र पाटील आणि खासदार उदयनराजे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. नरेंद्र पाटील यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीला उभे राहिले होते. तर उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. यावेळी उदयनराजे यांनी नरेंद्र पाटील यांचा दारुण पराभव केला होता. नरेंद्र पाटील आणि उदयनराजे यांची लढत चांगलीच गाजली होती. पण, उदयनराजे यांनी सहज निवडणूक जिंकली होती. मैदानातील लढाईनंतर आता दोन्ही नेते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘जिथे भेळ, तिथे खेळ’, ‘खाऊ तिथे, आम्ही जाऊ’, बागुलांच्या शिवसेना प्रवेशावर मनसेचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER