पंतप्रधान मोदींच्या हस्ते 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात

Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)16 जानेवारीपासून भारतात जगातील सर्वात मोठया कोरोना लसीकरण मोहीमेला सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी को विन ॲपची देखील सुरू करणार आहेत. कोरोना लस देशभरात पोहोचवण्याचे काम सध्या युद्ध स्तरावर सुरू आहे. सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड (Covishield of Serum Institute) आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसींना सध्या परवानगी देण्यात आली आहे.

देशातील दोन लसींना आपत्कालीन मंजुरी मिळाली आहे, त्यातील एक कोविशिल्ड आणि दुसरी कोवॅक्सिन आहे. पहिल्या टप्प्यात फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या कामगारांची संख्या जवळपास 3 कोटी आहे. यानंतर ही लस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि गंभीर आजार असलेल्या लोकांना दिली जाईल.

कोविशिल्ड लसीचे 1.1 कोटी डोस सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून खरेदी केले आहेत. कर वगळता प्रत्येक डोसची किंमत 200 रुपये असणार आहे. कोवॅक्सिनचे 55 लाख डोस भारत बायोटेककडून खरेदी केले जाणार असल्याचेही सरकारने सांगितलं आहे. यापैकी कोवॅक्सिनच्या 38.5 लाख डोसची किंमत प्रत्येकी 295 रुपये (कर वगळता) किंमत असेल. तर भारत बायोटेक 16.5 लाख डोस विनामूल्य देणार आहे.

कोरोना लसीकरणाविषयी, आरोग्य मंत्रालयाने सांगितले की ही लस 28 दिवसांच्या फरकाने दिली जाईल आणि दुसरी लस दिल्यानंतर 14 दिवसानंतर लसीचा परिणाम सुरू होईल. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, डोस पूर्ण झाल्यानंतर 14 दिवसानंतर या लसीचा परिणाम दिसून येऊ शकेल. आम्ही लोकांना कोविड 19 संबंधित प्रोटोकॉलचे पालक करण्याचं आवाहन केलं आहे. लसीच्या दोन डोसांमध्ये 28 दिवसांचा फरक असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER