पुढील वीस वर्षे नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही : रामदेव बाबा

Ramdev Baba And Pm Modi

नवी दिल्ली : मी मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे पुढची २० वर्षे त्यांना काहीही पर्याय नाही, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी त्रियोग करावा तर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा असा खोचक सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला.

देशातील कोट्यावधी लोकांच्यात विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या बरोबरीची व्यक्ती हजारो किलोमीटर दूर आहेत. पंतप्रधान मोदी आणि विरोधकांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. मोदी देशाचा विश्वासघात करू शकत नाहीत. देशाला फोडण्याचा किंवा सोडण्याचा विचार मोदीजी करू शकत नाहीत. ज्या व्यक्तीकडे काहीही नाही त्याला फक्त मातृभूमीला देण्यासाठी खुप काही असते रामदेव बाबा यांनी वक्तव्य केले आहे.

राष्ट्रभक्ती माझ्यात आहे. तीच राष्ट्रभक्ती मोदीजींच्यात आहे. मी देव, गाव, गरीब, कामगार, शेतकरी, शोषित, वंचीतांचा भक्त आहे. मी सेवा करणार साधक, योग गुरू व कर्मयोगी आहे. असेच काम मोदीजींकडून होत आहे. माझे देशाला सांगणे आहे योगी बना, उद्योगी बना, सहयोगी बना हा संदेश रामदेव बाबांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER