नरेंद्र मोदींना मानसिक पराभव मान्य- राज ठाकरे

PM Modi-Raj Thackeray

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानसिक पराभव मान्य केला आहे, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. एवढंच नाही तर पत्रकारांच्या प्रश्नांना मोदी एवढं का घाबरतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

ही बातमी पण वाचा:- मोदी-शाहांनी आजपर्यंत दादागिरीच केली, मग ममतांनी केली तर बिघडलं काय ? : राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या हस्ते आज (ता.१८) दादरमधील आंबा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी मोदींच्या कालच्‍या पत्रकार परिषदेवरही निशाणा साधला. ‘मोदींच्या कालच्या पत्रकार परिषदेबद्दल न बोलणेच बरे आहे; कारण तेच काहीच बोलले नाहीत, तर मग आपण काय बोलायचे. तसेच पाच वर्षांत तुम्ही पत्रकारांसमोर कधीच आला नाहीत. पंतप्रधान पत्रकारांना एवढे का घाबरतात, याचे उत्तर त्यांनी स्वत:च द्यावे.  असे त्यांनी काय केले आहे ज्यामुळे ते एवढे पत्रकारांपासून पळत आहेत?’ असेही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेने एकही उमेदवार उभा केला नाही. मात्र महाराष्ट्रात त्यांनी मोदी -शहा विरोधात प्रचार सभा घेतल्या.