मुंबईत तीन लाखांचे अमली पदार्थ जप्त

मुंबई : मालवणी येथील कादरी मशीद परिसरात काही जण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मालवणी पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार बुधवारी त्यांनी निरीक्षक महेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून या परिसरात सापळा रचण्यात आला.

या वेळी आस्मा कुरेशी आणि सलमा शेख या परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्या. त्यांची झडती घेतली असता दोघींकडे प्रत्येकी पन्नास ग्रॅम ब्राऊन शुगर आढळली. याची बाजारात किंमत तीन लाख रुपये आहे.

दरम्यान मालवणी येथे अमलीपदार्थांची विक्री करीत असल्याच्या आरोपावरून मालवणी पोलिसांनी आस्मा कुरेशी व सलमा शेख दोन्ही महिलांना अटक केली.या दोघींनी हे अमलीपदार्थ कुठून आणले याची चौकशी सुरू आहे