आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची नार्को टेस्ट करा, भाजपची मागणी

Sanjay Raut-Aaditya Thackeray- Narco Test

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant singh rajput)प्रकरणात आता राजकीय हस्तक्षेप वाढू लागला आहे. रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून रोखठोक भूमिका मांडत भाजपा, सुशांत सिंग राजपूत कुटुंब, सीबीआय यांच्यावर भाष्य केले होत. त्यानंतर भाजपानेही शिवसेना(Shivsena) आणि काँग्रेसवर(Congress)पलटवार केला आहे. पक्षाचे प्रवक्ते निखिल आनंद (Nikhil Aanad) यांनी महाराष्ट्र सरकार सुशांत सिंग राजपूतच्या सीबीआय चौकशीमुळे भयभीत का आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

या प्रकरणात संजय राऊत (Sanjay raut) आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची नार्को टेस्ट  (Narco Test)करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. निखिल आनंद म्हणाले की, सुशांत प्रकरणात काँग्रेसने बोलायला हवं. महाराष्ट्र सरकार घाणेरडे राजकारण करत आहे. फक्त आदित्यचं नव्हे तर या प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या प्रकरणात मौन सोडायला हवं. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीबीआयने (CBI) या सर्व बाबींकडे लक्ष घातलं पाहिजे.

तसेच ‘सीबीआयच्या तपासामुळे शिवसेनेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना भयभीत झाली आहे. जर शिवसेनेच्या लोकांना सर्व काही माहित असेल तर सीबीआयने संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून हे सत्य बाहेर समोर येईल. आदित्य ठाकरे यांनी भीतीपोटी स्पष्टीकरण दिलं आहे, त्यांनीच का राहुल गांधी (Rahul gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही मौन सोडावं असं निखील आनंद यांनी म्हटलं आहे.

ह्या बातम्या पण वाचा  :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER