नारायण राणेंचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद; फारसं लक्ष देऊ नका : शरद पवार

Sharad Pawar & Narayan Rane

मुंबई : अमित शहा (Amit Shah) यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) जाईल, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले होते . यावरून राणे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिस्कील शैलीत टीकास्त्र सोडले . ते रविवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत; पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. नारायण राणेंच्या वक्तव्याकडे त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER