ठाकरेंसंदर्भात नारायण राणे यांची कबुली

Naryan Rane & Uddhav Thackeray

रत्नागिरी : आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोकण येथे येणार आहेत. शिवसेनेशी नारायण राणे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे; पण मागील काही दिवसांमध्ये राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेल्या फोनची चर्चा रंगली होती. राणे यांनी मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी मुख्यामंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला, असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. राणे यांनी सांगितले की, “मेडिकल कॉलेजच्या परवानगीचा संबंध हा राज्याशी येत नाही. मी ठाकरेंना फोन केला नव्हता.” याबाबत विनायक राऊत यांच्या बोलण्यात किंवा दाव्यात काहीही तथ्य दिसत नाही.

पत्रकार परिषदेत झालेल्या बैठकीत काल नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले आहे, याची कबुली दिली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना त्यांनी आपला आक्रमकपणा कायम ठेवला. मेडिकल कॉलेजचा विषय हा केंद्र सरकरचा आहे. राज्य सरकारकडून तुम्हाला काही त्रास झाला का? असा सवाल राणे यांना विचारण्यात आला. यावर राणे बोलले की, “मला त्रास द्यावा एवढी या सरकारची क्षमता नाही. हे माझे काय करू शकतात? परवानग्या नाकारल्या तर कोर्ट आहे ना!” अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER