… अन्यथा आम्ही आंदोलन करू ; नारायण राणेंचा ठाकरे सरकारला इशारा

Thackeray Govt-Narayan Rane

मुंबई : राज्य शासनाने वादळग्रस्तांना (Tauktae cyclone) जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला आहे. मालवणमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळं मोठं नुकसान झालं असताना येथील आमदार, खासदार काय करतात? मदत फक्त भाजप (political party) करत आहे, असेही ते म्हणाले .तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. फळबागा, शेतींनाही वादळाचा फटका बसला आहे. तर, अनेक गावं अजूनही अंधारात आहेत.

या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचा पाहणी दौरा सध्या सिंधुदुर्ग भागात सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही वादळग्रस्त भागांचा दौरा केला होता. त्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनीही शुक्रवारी दुपारी देवबाग येथील वादळग्रस्त भागांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button