हिंदुत्व ज्यांचा श्वास होता… बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नारायण राणेंचे ट्विट

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray birth anniversary) माजी शिवसैनिक आणि भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विट केले आहे. हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्वापासून तसूभरही ढळले नाहीत अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

या ट्विटच्या माध्यमातून नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राणे यांच्याशिवाय राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मूल्यांशी तडजोड करण्याचा प्रश्न आला तेव्हा बाळासाहेब आपल्या ध्येयापासून कधीच ढळले नाहीत. त्यांनी लोकांसाठी अविरतपणे काम केले, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बर्‍याच खेळाडूंना दुखापत झाली असली तरी ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला तीन विकेट्सने पराभूत करून मालिका २-१ ने जिंकली आणि त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER