अमित शाहंच्या पायगुणाने राज्य सरकार जावे ; नारायण राणेंची इच्छा

Naryan Rane & amit Saha

मुंबई : सिंधुदुर्गातल्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) करणार आहेत. त्याआधी भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला . अमित शाह यांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा नारायण राणेंनी बोलून दाखवली.

शिवसेनेशी युतीचा प्रश्नच येत नाही, अशी पक्षातली भूमिका आहे. विधानसभा अध्यक्षपदाबाबत भाजपने बाजी मारली पाहिजे, असे मत राणेंनी व्यक्त केले . पुढच्या निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर भाजपचा असेल, गुजराती समाज मोदी आणि शाह यांना सोडून बिनबुडाच्या लोकांकडे जाणार नाही. आम्ही फोडाफोडीत पीएचडी केली आहे. तसंच युतीबाबत मनसेने ठरवावं, शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजप समर्थ आहे, अशी भूमिका नारायण राणेंनी मांडली.

शेतकऱ्यांना समोर करून आंदोलन हिंसक केलं जात आहे. अशा आंदोलनातून शेतकऱ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मग आंदोलन का? याच्या मागे काँग्रेस आणि बाहेरचे लोक आहेत. सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह आहे, असं वक्तव्य नारायण राणेंनी केले . राज्यात भाजपच एक नंबरचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे सरकार नीट चालवतात का? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER