
मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज (शनिवार) कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्धाघटन झालं. यावेळी त्यांनी संवाद साधताना अप्रत्यक्षपणे भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावर राणे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर दिले आहे .
मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी, असे नारायण राणे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी. @CMOMaharashtra@OfficeofUThttps://t.co/SklDkFH0bz
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 6, 2021
दरम्यान अनेकदा भूमिपूजनं होतात, नारळ फुटतात आणि नंतर कोणी तिकडं कोणी फिरकत नाही. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, पण तुम्ही लोकं जी काही मागणी करत आहात, ती स्वतःसाठी करत नाही. मला स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय पाहिजे, रुग्णालय पाहिजे, तसं नाहीए. सत्ताधारी म्हणजे आपण सेवेकरी आहोत, या सत्तेचा स्वतःसाठी दुरूपयोग न करता, जे तुम्ही वैद्यकीय महाविद्यालयं मागितलेले आहेत, ते देखील सरकारी मागितलेले आहेत. नाहीतर स्वतःसाठी मागू शकत होता. सगळ काही मलाच पाहिजे, माझंच पाहिजे असा तुम्ही विचार केला नाही, म्हणून मला तुमचा अभिमान आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक हे असेच असायला हवेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला