स्वातंत्र्यवीरांना अभिवादन नाही, मुख्यमंत्र्यांना सावरकर आणि हिंदुत्वाचा विसर : नारायण राणे

मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला .

काल शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सावरकरांना अभिवादन केले नाही. सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर, अशी टीका नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

राणे यांनी ट्विटरवरून ही टीका केली आहे. काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरून आणि सीएमओ या ट्विटर हँडलवरूनही सावरकरांना अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी? अशी टीका राणेंनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER