कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले ? नारायण राणे संतापले

Maharashtra Today

मुंबई : पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ (Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra) या पुस्तकाचा सर्व स्तरावरून निषेध करण्यात येत आहे .

छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हत्येचा आरोप करुन त्यांची बदनामी केल्याचं या संघटना आणि पक्षांचं म्हणणं आहे. भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan-rane)यांनीही गिरीश कुबेर(Girish Kuber) याच्या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे .
कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं याची माहिती मिळाली पाहिजे. गिरीश कुबेर तुम्ही मर्यादा सोडून हे लेखन केलं आहे, त्यामुळे मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही, असं ट्वीट नारायण राणे यांनी केले .

गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केले आहे. या लेखनाबद्दल गिरीश कुबेर यांचा मी जाहीर निषेध करतो. त्यांच्या या लेखनामुळे मराठा समाजाला दुःख वाटत आहे, असे नारायण राणे यांंनी म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button