नारायण राणेंनी संभाजीराजेंचा आदर्श घेतला पाहिजे ; शिवसेनेच्या नेत्याचा टोला

Maharashtra Today

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे . यापार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असून

छत्रपती संभाजीराजेंचा ( sambhaji raje)आदर्श नारायण राणेंनी (Narayan Rane) घेतला पाहिजे , असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत(vinayak-raut ) यांना खासदार नारायण राणे यांना लगावला आहे.

रत्नागिरी येथील लांजा इथं पत्रकारांशी बोलत असताना विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला . छत्रपती संभाजीराजे हे मोठं व्यक्तिमत्त्व आहे, ते आदरणीय असे व्यक्तिमत्व आहेत. मात्र संभाजीराजे आणि नारायण राणे यांची तुलना कधी होऊ शकत नाही. संभाजी राजेंचा आदर्श नारायण राणेंनी घेतला पाहिजे, असे माझं मत असल्याचे ते म्हणाले .

नारायण राणे हे स्वत:च्या स्वार्थसाठी पक्ष बदलत असतो. तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही, असे राऊत म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button