नारायण राणेंचा गौप्यस्फोट, पवार आणि ठाकरेंमध्ये भेट झालीच नाही

Narayan Rane-Sharad Pawar and Thackeray never met

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने विरोधक आक्रमक झाले आहे. कोरोनाला रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करून राज्यात  राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सकाळी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत गुप्त बैठक घेतली. मात्र, भाजपचे नेते नारायण राणे यांनी अशी बैठक झालीच नसल्याचा असा दावा केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार हे सोमवारी संध्याकाळी ‘मातोश्री’वर गेलेच नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत अशी कोणतीही बैठक झालीच नाही, असा दावाच नारायण राणे यांनी केला आहे. तसंच,  ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार आपल्या पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जमत नाही. हे सरकार आपोआप पडेल. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. अडीच-तीन हजारांनी कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. हजारो लोकांचे प्राण वाचवू शकले नाहीत, यावर राज्यपालांकडे केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी हे भाजपाचे नाही तर आपले वैयक्तीक मत असल्याचा खुलासा खासदार नारायण राणे यांनी केला.

ही बातमी पण वाचा:- राज्यपालांसोबतच्या चर्चेनंतर शरद पवार थेट मातोश्रीवर 

काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना घरात बसण्यापेक्षा आपले महसूलमंत्रीपद प्रिय आहे. त्यांना आपल्या मंत्रिपदाची चिंता आहे. त्यामुळे ते सरकार टिकेल असं म्हणत आहे’, असा टोलाही राणेंनी लगावला.

केंद्राने पॅकेज दिलं आहे, महाराष्ट्रानेही शेतकरी, मजुरांसह सर्वच क्षेत्राला दिलासा देणारं पॅकेज द्यावं, या सरकारमध्ये प्रशासनच नाही, केंद्रावर कशाला बोट ठेवता? कामगार कुठून आणणार? त्यांना अन्न-धान्य दिलं का तुम्ही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER