नारायण राणे दुःखी आत्मा, विक्रम-वेताळासारखी अवस्था; नीलम गोऱ्हे यांचा टोमणा

neelam Grohe & Naryane Rane

मुंबई : “भाजपा नेते नारायण राणे दुःखी आत्मा आहेत. त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी झाली आहे. एका जाहिरातीत ‘धुंडते रह जाओगे’ असे म्हटले आहे, तसेच पुरावे त्यांच्याजवळ आहेत, अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली. दिवाळीनंतर हे सरकार पडणार, असे नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले. दिवाळीनंतर भाजपा राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ राबविणार, असा दावा करत शिवसेनेवर टीका केली. त्या टीकेला नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रत्युत्तर दिले. (Neelam Gorhe slams Narayan Rane).

नारायण राणे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. राणे यांनी १२ डिसेंबरपर्यंत त्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. दरम्यान, भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे-वायकर कुटुंबीयांच्या नावावर सातबारा उतारे आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांवर नीलम गोऱ्हे म्हणाल्या – किरीट सोमय्या यांचे व्यक्तिमत्त्व पाहिले तर त्यांचे विषय जेवणातल्या लोणच्याप्रमाणे आहेत. किरीट सोमय्या ‘पांचट’ आहे हा वायकरांचा शब्दप्रयोग मला फार आवडला, असा टोमणा गोऱ्हे यांनी मारला.

महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्कीच होणार – राणे
बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा नारायण राणे यांनी केला. मात्र, याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. लवकरच मी याबद्दल प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलेन, असे म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER