बाळासाहेबांमुळे शांत आहे, दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतले आणि बाहेरचे सगळं बाहेर काढेन : नारायण राणे

Narayane Rane & Uddhav Thakeray

मुंबई :- दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेला नारायण राणे (Narayane Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कुणाला बेडूक म्हणताय? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मला मुख्यमंत्री केलं. ते असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केले नसते, असे सांगतानाच राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा. गेल्या 40 वर्षात जे पाहिलं-ऐकलं ते बाहेर काढेल तर पळता भूई थोडी होईल, असा इशारा भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (26 ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली होती. या टीकेला नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले .

राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा त्यांनी कालच्या भाषणात उल्लेख नाही. त्यांनी कालच्या भाषणात ना शेतकऱ्याचा उल्लेख केला, ना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले. कोरोनावर तर ते बोललेही नाही. देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांचे दसरा मेळाव्यातले भाषण होते निर्बुद्ध बरळणे – नारायण राणे यांची टीका

बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी छळलं आहे. 2005-06 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना भवनसमोर गडकरी चौकात घ्यावं असं वाटत होते. त्यांनी सर्व नेत्यांसमोर तसं सांगितलं. मी त्यांच्याविषयी अशा घटना सांगितल्या तर मुख्यमंत्रीपद सोडून पळतील हे, असा टोला राणेंनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे न ऐकता आपल्या वाढदिवसाला 27 जुलै 2006 रोजी नव्या शिवसेना भवनाचं उद्धाटन केले. बाळासाहेब ठाकरे यांनी दसऱ्याला उद्घाटन करण्यास सांगितले होते. वडिलांचं नाव सांगतात. वाघ म्हणवून घेतात, कुणाच्या कानफडात तरी मारली का? केसेस आम्ही अंगावर घेतल्यात, असे नारायण राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER