नारायण राणेंना कोरोनाची लागण

मुंबई : राज्य सरकारने अनलॉक-५ बाबत नवी नियमावली जारी केली आहे. बार, रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच बॉलिवूडपासून ते राजकारण्यांपर्यंत कोरोनानं अनेकांच्या घरात शिरकाव केला आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

नारायण राणे यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली. ‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन.’ असे ट्विट राणे यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER